जिथे आईबाबा कामानिमित्त बराच वेळ घराबाहेर असतात तिथे आजी आजोबा आणि नातवंडे
जास्त वेळ एकत्र असतात.
काळ बदलला आहे, नवनवे विषय पुढे येंत आहेत. अश्यावेळी आजी आजोबांनी मूल पुन्हा
नव्याने समजून घ्यायची वेळ आली आहे.
मूल शिकते म्हणजे नक्की काय?
शिस्त म्हणजे काय?(आपण आपल्या आईवडिलांचं ऐकत होतो ते आदरापोटी का भीतीपोटी?)
मुलांवर संस्कार करायचे म्हणजे फक्त श्लोक, प्रार्थना शिकवायच्या का त्यांच्यामध्ये उपजत
असलेली मूल्ये जोपासायची?
मुलांच्या निकोप वाढीसाठी आईवडील आणि आजी आजोबा यांच्यात सुसंवाद असणे का
गरजेचे आहे ?
मुलांकडे अती लक्ष देणे, त्यांचे मन रमवण्याची सतत जबाबदारी घेणे आणि त्याने दमून जाणे हे
कसे टाळता येईल?
अश्या अनेक मुद्द्यांसंदर्भात आमच्या २५+ वर्षांच्या संशोधनातून पुढे आलेले निष्कर्ष आम्ही
मांडणार आहोत. तसेच यावर एकत्र मोकळी चर्चा करणार आहोत.
